कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना नोटीस ; एसबीआय बँकेला दंड

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I उदगीर तालुक्यातील चोंडी येथील शेतकरी शिवाप्पा रामन्ना चिट्टे यांनी 22 मे 2013 रोजी उदगीर येथील मोंढा रोड वरील भारतीय स्टेट बँकच्या शाखेकडून, ‘एटीएल कॉम्प मायनर एरिगेशन’ या कामासाठी 2 लाख रुपयांचे मुदत कर्ज घेतले होते. याची त्यांनी परतफेड देखील केली. असे असताना त्यांना 60 हजार 209 रुपयांचा भरणा करा अशी नोटीस बजावली गेली.

त्यानंतर बँकेने अजून नोटीस बजावल्या, असे असताना महाराष्ट्र सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले असतानाही, शेतकऱ्याला नोटीस पाठवून थकबाकी भरुन घेण्यास सांगणाऱ्या या एसबीआय बँकेला ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. बँकेला पाच हजारांचा दंड ठोकून सदर शेतकऱ्यास बेबाकी प्रमाणपत्र आणि 7/12 वरिल बोजा कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजने अंतर्गत माफ केले होते. त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी याची कल्पना बँकेला दिली आणि बेबाकी प्रमाणपत्र आणि 7/12 वरील बोजा कमी करण्याची विनंती बँकेकडे केली होती. असे असताना देखील बँकेने याकडे लक्ष दिले नाही.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम