कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला खूश कसे करायचे याचे हिताचे निर्णय घेतले जात आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही साखर कारखानदारांमधील हवेतील अंतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.
कापणी व वाहतुकीचे निकष ठरवताना पुढील हंगामापासून वजनकाट्यासाठी डिजिटल वजन काटे सुरू करावेत, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी त्यांनी ऊस वाहतूकदारांच्या समस्यांबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविण्याचे निर्देश दिले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम