कांदा बाजारभाव वाढले; जून-जुलैमध्ये कसे असतील?

बातमी शेअर करा

लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभावात सध्या २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, कमीत कमी १००० रुपये तर सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजारांसह देशभरातील कांदा बाजारपेठांमध्ये मागील आठवड्यात कांद्याची आवक ७ टक्क्यांनी वाढली आहे. कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. ‘लोकमत ॲग्रो’ने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून पुढील कांदा बाजारभावांचा अंदाज घेतला आहे.

यंदाचे कांदा उत्पादन
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने २३-२४ वर्षासाठी दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, यंदा २४२.१२ लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे, जे मागील वर्षीच्या ३०२ लाख टनाच्या तुलनेत ६० लाख टनांनी कमी असेल. महाराष्ट्रात ११२.६ लाख क्विंटल कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

निर्यातदारांचा अंदाज
पाऊसमान चांगले असल्यास कांदा उत्पादन २५० लाख मे. टनापेक्षा जास्त होऊ शकते, असे निर्यातदारांचे मत आहे. यंदा कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील कांदा उत्पादन चांगले राहण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही कांदा उत्पादन चांगले होईल.

 

कांदा उत्पादकतेबद्दल तज्ज्ञांचे मत
राहुरी कृषी विद्यापीठातील कांदा पैदासकार डॉ. बी.टी. पाटील यांनी सांगितले की, कांद्याची उत्पादकता हेक्टरी १५ ते २० टन आहे. पाऊस जास्त किंवा अपुरा झाला तर उत्पादकतेवर परिणाम होतो. कीड-रोगांमुळे उत्पादन घटते.

 निर्यात स्थिती
देशात निर्यातीवरील निर्बंध आणि ४० टक्के निर्यात शुल्कामुळे यंदा निर्यात कमी झाली आहे. पाकिस्तानने स्वस्तात कांदा विकल्याने त्यांच्या कांद्याला मागणी जास्त होती. पाकिस्तानने तब्बल २०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई कांदा निर्यातीतून केली.

कांदा किंमतींचा अंदाज
लासलगाव बाजारातील सरासरी किंमत १९६७ रुपये प्रति क्विंटल होती. किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलैच्या मध्यापर्यंत किंमती २ हजार ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहण्याचा अंदाज आहे. खरीप, लेट खरीप लागवड आणि मॉन्सूनच्या अंदाजावर किंमतीचा पुढील अंदाज घेता येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम