जळगावमध्ये केळी पिकांचे नुकसान: खासदार स्मिताताई वाघ यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा

जळगाव – तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन खासदार स्मिता वाघ यांनी 11 जून रोजी करंजा गावात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकांचे नुकसान तपासले. त्यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पंचनामे नीट तपासून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या.

 

 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे, मनोहर पाटील, मिलिंद चौधरी, हर्षल चौधरी, शालिक पाटील, समाधान सपकाळे, गिरीश वऱ्हाडे, कल्पेश सोनवणे, सचिन पवार, अरविंद सपकाळे, नाना पाटील व शेतकरी बंधू गावकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम