कार्तिकी एकादशीच्यानिमित्ताने जनावरांच्या बाजारात कोट्यावधी उलाढाल !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २५ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक उत्साह असतांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अनेक जनावरांचा बाजार सुरु असतो असाच एक बाजार कार्तिकी एकादशीच्यानिमित्ताने पंढरपूरात जनावरांच्या बाजारात दोन ते अडीच कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ही उलाढाल विक्रमी असल्याचे मानले जात आहे. या उलाढालीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तीन वर्षांनंतर यंदा पंढरपुर येथे कार्तिकी जनावरांचा बाजार भरला होता. खिलार जनावरांसाठी येथील बाजार प्रसिद्ध आहे. बाजारात राज्यासह कर्नाटक मधून सुमारे पाच हजाराहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली‌ होती. यामध्ये सुमारे अडीच ते तीन‌ हजार जनावरांची खरेदी विक्री झाली. या बाजारात तब्बल दोन ते अडीच कोटींची आर्थिक उलाढाल झाली. यामध्ये प्रामुख्याने खिलार जातीच्या खोंड आणि बैलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाल्याचे समजते. दरम्यान यंदाच्या बाजारातून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम