कांदा बियाणे: ‘या’ तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार कांदा बियाणे; राहुरी विद्यापीठाची माहिती

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ मे २०२४ | राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून २१ मे २०२४ पासून कांदा बियाणे विक्री सुरू होणार आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या खरीप कांद्याच्या ‘फुले समर्थ’ आणि ‘फुले बसवंत-७८०’ या वाणांची विक्री होणार आहे. कांदा बियाण्यांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

नोटिफिकेशन अपडेट पोर्टल: मिळवा तुमच्या जमिनीवरील घडामोडींची त्वरित माहिती

‘या’ ठिकाणी मिळणार बियाणे
राहुरी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘फुले समर्थ’ आणि ‘फुले बसवंत-७८०’ या कांद्याच्या वाणांना शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, निफाड, कांदा, लसूण आणि द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर, कृषी संशोधन केंद्र, बोरगाव, जि. सातारा, कृषी महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक, कृषी संशोधन केंद्र लखमापूर, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी महाविद्यालय पुणे आणि कृषी महाविद्यालय हाळगाव, ता. जामखेड या ठिकाणी या वाणांची विक्री सुरू होणार आहे.

‘कांदा प्रक्रिया’ अतिरिक्त मालाचे मूल्यवर्धन करून देणारा फायदेशीर उद्योग

फुले समर्थ वाणाची वैशिष्ट्ये
फुले समर्थ हा वाण स्थानिक वाणातून विकसित केला आहे. हा वाण खरीप आणि रांगडा हंगामासाठी योग्य असून, कांदे चमकदार गर्द लाल रंगाचे आणि उबट गोल असतात. कांद्याची नैसर्गिकपणे पात पडते. कांदा ८६ ते ९० दिवसांत काढणीस तयार होतो, त्यामुळे दोन ते तीन पाणी पाळ्यांची बचत होते. खरीप हंगामात या वाणापासून २८० क्विंटल प्रति हेक्टर तर रांगड्या हंगामात ४०० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळते.

Goat Farming | ‘या’ तीन जातींच्या शेळ्यांपासून बनाल लखपती; जाणून घ्या वैशिष्ट्ये

फुले बसवंत वाणाची वैशिष्ट्ये
हा वाण पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने स्थानिक वाणातून विकसित केला आहे. हा वाण खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. कांदे आकाराने मध्यम ते मोठे आणि शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. रंग गडद लाल असून हा वाण काढणीनंतर तीन ते चार महिने साठवणुकीत टिकून राहतो. हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटलपर्यंत मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम