‘कांदा प्रक्रिया’ अतिरिक्त मालाचे मूल्यवर्धन करून देणारा फायदेशीर उद्योग

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ मे २०२४ | महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा पिकवला जातो. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच पुणे, सोलापूर, जळगाव यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्येही कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो. शेतकऱ्यांना अनेकदा कांदा जास्त काळ साठवून ठेवण्यात अडचणी येतात, कारण तो खराब होऊ शकतो किंवा वजन कमी होऊ शकते. काही भागात साठवणुकीच्या सोयी कमी आहेत. या समस्यांचा उपाय म्हणून गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास त्यांना फायदा होईल.

Goat Farming | ‘या’ तीन जातींच्या शेळ्यांपासून बनाल लखपती; जाणून घ्या वैशिष्ट्ये

कांद्याचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. सध्या, भारतात उगवलेल्या अन्नपदार्थांवर फार कमी प्रमाणात प्रक्रिया केली जाते. बहुतेक ते खराब होतात कारण ते योग्यरित्या संग्रहित किंवा प्रक्रिया केले जात नाहीत. कांद्यात भरपूर पाणी असल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाहीत. कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी, त्याचे निर्जलीकरण करून चिप्स, पावडर, पेस्ट, रस आणि लोणचे यासारखी उत्पादने तयार करता येतात. या उत्पादनांना परदेशातही मागणी आहे.

कांदा प्रक्रियेचे फायदे

– बाजारातील मागणी विचारात घेऊन आवश्यक पदार्थ शेतमालापासून तयार करता येतो.
– शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण येईल व किंमत वाढण्यास किंवा स्थिर राहण्यासाठी मदत होईल.
– ज्या भागात शेतमाल विकला जात नाही अशा भागात शेतमाल उपलब्ध करून देता येईल.
– कांदा प्रक्रिया उद्योगामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील व बेरोजगारी कमी होईल.
– प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या उद्योगांना चालना मिळेल.
– थोडक्यात, पिकांच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया हे एक उत्कृष्ट साधन आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो.

राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा

कांदा प्रक्रिया पदार्थ

कांद्याच्या निर्जलीकरण चकत्या
कांद्याचे लहान किंवा गोलाकार काप करून ते उच्च तापमानात निर्जलीकरण करावेत. नंतर या चकत्या हवाबंद डब्यात किंवा पाकिटात पॅक कराव्यात. या चकत्यांचा उपयोग सूप, सॉस, सॅलड सजविण्यासाठी केला जातो.

कांद्याची पावडर
कांद्याचे काप उच्च तापमानात निर्जलीकरण करून मिक्सरमध्ये कुटून किंवा ग्राइंड करून कांद्याची पावडर बनविली जाते. ही पावडर हवाबंद डब्यात किंवा पाकिटात पॅक करावी. पावडरचा उपयोग सूप, सॉस, सॅलड यासाठी होतो.

कांद्याचे लोणचे
कांद्याचे चार तुकडे करून ते भरपूर मीठ आणि लिंबाच्या रसात गुंडाळून ४ तास बाजूला ठेवा. नंतर काचेच्या भांड्यात तेल, आमचूर पावडर, तिखट, कांदा, मसाले आणि लिंबाचा रस व मीठ टाकून उरलेले तेल वरून टाकावे. हे लोणचे एक महिन्या पर्यंत टिकते.

कांदा तेल
अल्कोहोलविरहित पेय, आईस्क्रीम, चॉकलेट, च्युइंगम, लोणचे इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी कांद्याचे तेल वापरले जाते. कांदा तेल पिवळसर तपकिरी रंगाचे असते.

कांदा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे यंत्र व उपकरणे

– पिलिंग मशीन (साल काढण्यासाठी)
– चकत्या करण्याचे मशीन
– ड्रायर मशीन
– मिक्सिंग मशीन
– पल्वलायझर
– ऑटोमॅटिक पाउच पॅकिंग मशीन
– लेबलिंग मशीन

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम