कृषी सेवक | १८ मे २०२४ | राज्यात सध्या पशुपालन व्यवसायाला मोठे महत्त्व मिळाले आहे. शेतीतून मिळणारे अनिश्चित उत्पन्न आणि नैसर्गिक संकटांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. हे लक्षात घेऊन अनेक शेतकरी शेतीआधारित उद्योगांकडे वळत आहेत, ज्यामध्ये पशुपालन विशेषतः शेळीपालन महत्त्वाचे आहे.
कमी खर्चातील व्यवसाय
पशुपालन व्यवसायात शेळीपालन हा कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू करता येणारा व्यवसाय आहे. गाय किंवा म्हैस पालनाच्या तुलनेत हा व्यवसाय कमी खर्चिक आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेळीपालनाकडे वळत आहेत. अनेकजण या व्यवसायातून चांगली कमाई करत आहेत.
राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा
मिळेल भरघोस उत्पन्न
शेळीपालन मुख्यतः मांस उत्पादनासाठी केले जाते. म्हणून मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध जातींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण मांस उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या तीन शेळ्यांच्या जातींबद्दल जाणून घेणार आहोत. बकरी ईदच्या काळात या जातींच्या बोकडांना मोठी मागणी असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो.
‘या’ आहेत शेळ्यांच्या तीन जाती
गोहिलवाडी शेळी
गोहिलवाडी शेळी पशुपालकांमध्ये लोकप्रिय आहे. बकरी ईदच्या काळात या जातीच्या बोकडांना मोठी मागणी असते. गुजरात राज्यात या जातीचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. या जातीच्या बोकडांचे वजन सरासरी ५० ते ५५ किलो असते, तर शेळ्यांचे वजन ४० ते ४५ किलो भरते.
ऊस पिकात झपाट्याने वाढतोय ‘ब्लॅक बगचा’ प्रादुर्भाव; करा “हे” एकात्मिक नियंत्रण उपाय!
जखराना शेळी
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात या जातीच्या शेळ्यांचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. या जातीच्या बोकडांचे वजन सरासरी ५५ ते ६० किलोपर्यंत असते. या जातीचे संगोपन करून शेतकरी चांगली कमाई करू शकतात.
बारबरी शेळी
बारबरी शेळी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाळली जाते. या जातीच्या बोकडांचे वजन ३० ते ३५ किलो असते. बाजारात नेहमीच या जातीच्या बोकडांना मोठी मागणी असते.
शेळीपालनाच्या या तिन्ही जाती शेतकऱ्यांना चांगला फायदा देऊ शकतात आणि योग्य व्यवस्थापनाने लखपती बनण्याचा मार्ग खुला करू शकतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम