म्हैस व गायीचे दुध वाढविण्यासाठी हे उपाय महत्वाचे !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक शेतकरी शेती सोबत अनेक जोड व्यवसाय करीत असतात. त्यात प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात असतो. पण अनेक शेतकऱ्यांचे अचूक नियोजन नसल्याने पशुपालन व्यवसायात देखील अनेकदा तोटा होत असतो. या व्यवसायात सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. परंतु, पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते. त्यातील सर्वात मोठी आणि मुख्य अडचण म्हणजे गायी आणि म्हशींचे दूध कमी येणे. यामुळे दुग्धउत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

दरम्यान जनावरांमध्ये होणारी दुधाची घट टाळण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येतात. बऱ्याचदा शेतकरी दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी जनावरांना इंजेक्शन किंवा इतर औषधे दिली जातात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हे दूध सेवन करणे सुद्धा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जनावरांच्या दूध वाढीसाठी नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे.

paid add

दलिया, मेथी आणि गुळ व्यवस्थित शिजवून घ्यावा आणि त्यामध्ये नारळाचे खोबरे बारीक करून टाकावे. जनावर व्यायल्याच्या आधी एक महिना आणि जनावर व्यायल्यानंतर दोन महिने रोज सकाळी हे मिश्रण गाईला खाऊ घालावे. वासरू 21 दिवसांचे होईपर्यंत हा आहार द्यावा. त्यानंतर वासरू तीन महिन्यांचे झाले किंवा आईचे दूध कमी आले की दररोज 30 ग्रॅम जवसाचे औषध पाजावे. यामुळे दूध कमी होणार नाही.

जनावरांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना संतुलित आहार द्यावा. यामध्ये चाऱ्यातील मका, बार्ली, गहू, बाजरी हे पूर्वीच्या तुलनेत जास्त द्यावे. तसेच केकमध्ये मस्टर्ड केक, शेंगदाणा केक, कापूस पेंड, जवसाचे पेंड द्यावे. मोहरीचे तेल आणि धान्याच्या पिठापासून बनवलेले औषध सुद्धा दुधाच्या उत्पादन वाढीसाठी मदत करते. 200 ते 300 ग्रॅम मोहरीच्या तेलात 250 ग्रॅम गव्हाचे पीठ घेऊन संध्याकाळच्या वेळेस जनावरांना चाऱ्यासोबत खायला द्यावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे औषध दिल्यानंतर जनावरांना पाणी प्यायला देऊ नये. यामुळे खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. फक्त सात ते आठ दिवसाच हे औषध द्यावे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम