अर्जेंटीनात सोयाबीनचा केवळ ३७ टक्के पेरा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ Iजगातिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात ब्राझील आणि अमरिकेनंतर अर्जेंटीना तिसऱ्या स्थानावर आहे.

यंदा भारत आणि अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाला पाऊस आणि दुष्काळाच फटका बसला. मात्र ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढून यंदा जागतिक उत्पादनही वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला होता.

 

paid add

सध्या अर्जेंटीनात सोयाबीन पेरणी सुरु आहे. मात्र अनेक भागांना कमी पाऊस आणि उष्णतेचा फटका बसत आहे. अर्जेंटीनात आतापर्यंत सोयाबीनचा केवळ ३७ टक्के पेरा पूर्ण झाला. गेल्यावर्षीपेक्षा हा पेरा खूपच कमी आहे. अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती भीषण पातळीवर पोचली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत १६७ लाख हेक्टरवरच सोयाबीनची पेरणी झाली. कमी पावसामुळे अर्जेंटीनातील एकूण सोयाबीन लागवड कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम