ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ अशीच ठेवा – राजू शेट्टी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ I या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला. एकजुटीची ही वज्रमूठ अशीच ठेवून आता केंद्र सरकारला हमीभावाचा कायदा करण्यासही भाग पाडू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदणीतर्फे त्यांचा सत्कार व शेतकरी मेळावा घेतला. प्रा. जालंदर पाटील म्हणाले, ‘‘दोन वर्षांपासून राज्यात विक्रमी उसाचे उत्पादन होऊ लागले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे व वाढलेल्या महागाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडले आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी वगळता उर्वरित सर्व पिके घेणारे शेतकरी संकटात सापडला आहे.’’सावकर मादनाईक, शैलेश आडके, मिलिंद साखरपे, सागर शंभूशेटे, काका भगाटे, युनूस पटेल, तानाजी वठारे, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, रामगोंडा खंजिरे, पापालाल शेख, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम