एकरी १० लाख कमावण्याची संधी ; या वनस्पतीची करा लागवड !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २० फेब्रुवारी २०२३।  शेतकऱ्यांनी शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक पिकांबरोबरच काही वेगळ्या पद्धतीचे शेतीसुद्धा प्रायोगिक तत्वावर करून पहिली तर नक्कीच अधिक नफा शेतीतून कमावता येऊ शकतो. सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न कमावल्याचे आपण बातम्यांमध्ये ऐकले आहे. आज आम्ही अशाच स्टीव्हियाच्या शेतीबाबत तुम्हला माहिती देणार आहोत. एकरी १० लाख कमावण्याची संधी स्टीव्हिया लागवडीतून असून त्याचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.

शेतीमध्ये कोणताही नवीन प्रयोग करण्याआधी आपण त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्याची चाचणी करणे खूप गरजेचे आहे. अनेकदा आपण कुठेतरी वाचून काही करायला जातो आणि वेळेवर शेतमालाला मार्केट न मिळाल्यास मोठे नुकसान होते. त्यामुळे कोणताही नवीन प्रयोग शेतीत करताना तो प्रथम प्रायोगिक तत्वावर काही मर्यादित क्षेत्रात करून पाहायला हवा. त्यात जर फायदा झाला आणि आर्थिक गणित जुळून आले तरच नंतर त्याची अंबलबजावणी करायला हवी. आम्ही आज सांगत असलेल्या स्टीव्हिया लागवडीबाबतही तुम्ही जरूर विचार करा.
स्टीव्हिया हि औषधी वनस्पतींपैकी एक आहे. स्टीव्हियाच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. तसेच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यासोबतच कॅल्शियम, झिंक, लोह, फॉस्फरस, कॉपर, मॅंगनीज सारखे घटक देखील स्टीव्हियाच्या पानांमध्ये असल्याने सध्या त्याची मागणी वाढली आहे. अनेक रोगांवर स्टीव्हियाची पाने औषध म्हणून वापरली जातात. स्टीव्हियाच्या पानांमध्ये स्टीव्हियोसाइड्स आणि इल्कोसाइड्स म्हणून ओळखले जाणारे गोड पदार्थ असतात. या व्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये आणखी 6 घटक आहेत ज्यात इन्सुलिन संतुलित करण्याचे गुणधर्म आहे. त्याची गोडी टेबल शुगरपेक्षा 250 पट जास्त आणि सुक्रोजपेक्षा 300 पट जास्त आहे.

स्टीव्हियाची लागवड रोपे कापून किंवा बियाणे पद्धतीने करता येते. स्टीव्हियाची लागवड वर्षातून दोनदा करता येते. सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च दरम्यानचा कालावधी स्टीव्हिया लागवडीसाठी योग्य समजला जातो. लागवडीसाठी प्रथम बियाण्यांपासून रोपे तयार केली जातात. नंतर रोपे शेतात लावली जातात. स्टीव्हिया पिकाला उन्हाळ्यात दर आठवड्याला सिंचनाची गरज असते. तर थंडीमध्ये साधारण 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. एकदा लागवड केल्यास हे पीक पाच वर्षे सतत नफा देऊ शकते.

स्टीव्हिया ही एक औषधी वनस्पती आहे. सामान्यतः अनेक रोगांसाठी स्टीव्हियाच्या पानांचा वापर केला जातो. एका एकरात सुमारे 40,000 स्टेव्हिया रोपे लावता येतात. एकरी स्टीव्हिया लागवडीकरीता जवळपास एक लाख रुपये खर्च येतो. एका एकरात 40 हजार स्टेव्हियाची रोपे लावल्यास 25 ते 30 क्विंटल सुक्या पानांचे उत्पादन मिळते. बाजारात स्टीव्हियाची किंमत 250 ते 500 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी एका एकरात 8 ते 10 लाख रुपयांचा नफा नक्कीच मिळवू शकतो.
मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर – स्टीवियामध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म आहेत. यासोबतच यात क्षती बीटा पेशीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील गुणधर्म आहेत. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी स्टीविया खूप फायदेशीर आहे.

कर्करोग – या औषधी वनस्पतीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे कर्करोगविरोधी लढते. स्टीवियामध्ये केम्फेरोल नावाचा अँटीऑक्सिडेंट घटक असतो. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो. स्वादुपिंडाचा कर्करोग रोखण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यास मदत – स्टीविया ही वनस्पती गोड असूनही कॅलरीज खूप कमी असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साखरेऐवजी आहारामध्ये स्टीवियाचा समावेश करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्या – स्टीवियामध्ये ग्लायकोसाइड्स असतात. जे शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करतात. हे रक्तदाब पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. हे हृदयविकाराचा धोका कमी करते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम