पावसाने साथ न दिल्याने झेंडूने घेतला भाव !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १७ ऑक्टोबर २०२३

देशभरातील अनेक राज्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. यात यंदा फुलपिकांना देखील फटका बसला असून पावसाच्या भरवशावर झेंडूची लागवड झाली खरी. मात्र, यंदा पावसाने साथ न दिल्याने लागवड अन उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा विजयादशमीसह दिवाळी सणाला झेंडू भाव खाईल. घाऊक व्यापारी आतापासूनच फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, यंदा किरकोळ बाजारात झेंडूची फुले १०० ते १५० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची उम्मीद निर्माण झाली आहे.

राज्यात बहुतांशी भागात फुलशेती केली जाते, आणि अत्यल्प प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते. परंतु यंदा सरासरीपेक्षा निम्मा देखील पाऊस पडला नसल्याने भूर्गभागात पाणी पातळीत वाढ झाली नसल्याने झेंडूची फुलांची लागवड अत्यल्प झाली. ज्या शेतकरी झेंडूचे पिके घेत आहे. अशा शेतकऱ्यांनी झेंडूचे रोप साडेतीन ते चार रुपयांप्रमाणे विकत घेतले एका डबीत हजार सिड्‌स (बिया) असतात. गेल्या वर्षी एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांना मिळणारी बियाण्यांची डबी यंदा अडीच ते तीन हजार रुपयांना मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या फुलांना गणेशोत्सवात ३५ ते ४० रुपये घाऊक भाव मिळाला. किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकली गेली. पिवळ्या व केशरी झेंडूची लागवड वाढली. केशरीपेक्षा पिवळ्या झेंडूची किंमत दहा टक्क्यांनी अधिक असते.सध्या लागवड होत असलेली फुले दिवाळीत बाजारात येऊ शकतील. दरम्यान विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. किरकोळ बाजारात दसऱ्याला झेंडूची फुले शंभरी गाठू शकतील.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा लागवड कमी झाली. विहिरींना जेमतेम पाणी आहे. घाऊकला ५० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला तरच फुलशेती परवडेल. दसऱ्याला बाजारात फुले मुबलक येऊ शकतील. नवरात्र व दसऱ्याच्या सुमारास पाऊस झाल्यास तो फुलशेतीला फायदेशीर ठरून उत्पन्न वाढू शकेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम