संत्रीला ६ हजार प्रति क्विंटल मिळतोय भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I बाजारात सध्या संत्र्याचे दर दबावात आहेत. बदलत्या वातावरणामुळे थेट खाण्यासाठी मागणी कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. त्यामुळं संत्र्याला सरासरी ३ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय.

 

यंदा सुरुवातीपासूनच संत्र्याला पाऊस आणि वाढलेल्या तापमानाचा फटका बसला. मात्र उत्पादन कमी राहूनही दर दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र उन्हाचा चटका वाढल्यावर संत्र्याचेही दर वाढू शकतात, असा अंदाज संत्रा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम