गव्हाचे दर ३५०० पर्यंत पोहचले

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I  देशात सध्या गव्हाचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळं दरही तेजीत आहेत. प्रक्रिया उद्योगाकडून सरकारने खुल्या बाजारात गहू विक्रीची मागणी केली जातेय. मात्र यंदा सरकारकडील साठा कमी आहे.

 

१ डिसेंबरला सरकारी गोदामांमध्ये केवळ ११५ लाख टन गहू होता. तो मगीलवर्षी याच तारखेला २१३ लाख टन होता. म्हणजेच यंदा गव्हाचा साठा जवळपास निम्मा आहे. गव्हाचे दर सध्या २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले. पुढील काळातही गहू दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम