कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये दिनांक 1 ऑक्टोंबर, 2022 पासून सहकारी संस्थांच्या निवडणूकांना दिलेली स्थगीती उठविलेली आहे. दिनांक 15 जुलै, 2022 पासून स्थगीत असलेल्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
ज्या दुग्ध, मत्स्य, शेळी- मेढी व कुकूटपालन सहकारी (पदूम) संस्था निवडणूकीसाठी पात्र आहेत. त्यांनी जिल्हाचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक / धुळे – नंदुबार / अहमदनगर/ जळगाव यांचेशी संपर्क साधावा, असे विभागीय उपनिबधक, सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग नाशिक यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम