तुरीच्या दरातील तेजी कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | देशात सध्या तुरीचा तुटवडा आहे. त्यामुळं आफ्रिकी देशातून तूर आयात सुरु आहे. तरीही तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. मागील दोन महिन्यांपासून तुरीच्या दरात२०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळतेय. तुरीचे कमाल दर ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आल्यानंतर तुरीला उठाव मिळतोय. तर तुरीच्या कमाल दरानं ८ हजारांचा टप्पा पार केल्यानंतर मागणी काहीशी कमी होऊन दर पुन्हा नरमतात. मात्र मागील दोन महिन्यांत तुरीचा सरासरी दर ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान राहीला.

सध्या आफ्रिकेतून तूर आयात काहीशी जास्त होते. ही तूर प्रक्रियेसाठी ततकी योग्य नसते. या तुरीला मागणीही कमी राहते. त्यामुळे या तुरीचे दरही कमी असतात. पण म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे दर जास्त आहेत. भारतातील तुरीलाही चांगली मागणी असते. त्यामुळे या दोन्ही तुरीचे दर तेजीत आहेत. मागील आठवड्याचा विचार करता तुरीच्या भागात तेजीमंदी राहिली. आयात तुरीतूनही गरज पूर्ण होणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन देशात तुरीचे व्यवहार होत आहेत. सध्या तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. देशातील नवी तूर डिसेंबरपासून येण्यास सुरुवात होईल. मात्र गुणवत्तापूर्ण नव्या मालालाही चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज तूर प्रक्रियादारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम