एक शेतकरी एक ट्रान्स फार्मर डीपी योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 अंतर्गत कृषीपंपांना नवीन वीज जोडणी व अनुषंगिक विद्युत पायाभुत सुविधा उभारण्याकरिता दरवर्षी रु.1500 कोटी इतके भागभांडवल देण्याची योजना सदर योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षाकरिता प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कोणाला लाभ मिळणार

ज्या नविन कृषी पंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलपासून २०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना महावितरणद्वारे लघुदाब वाहिनीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
ज्या नविन कृषीपंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०० मीटरपेक्षा जास्त आहे परंतु उच्चदाब वाहिनी पासुन ६०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहीत (Off Grid) सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप देण्यात येणार आहे.

सदर धोरणा अंतर्गत महावितरणकडे दरवर्षी सर्वसाधारणपणे प्राप्त होणाऱ्या मागणीचा विचार करता अंदाजे १ लाख कृषीपंप अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर व उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित आहे.

त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर ऊर्जीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरणतर्फे उपलब्ध करुन देण्याचे नियोजित असून व उर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पध्दतीने उच्चदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लाख याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१,५०० कोटी भागभांडवल,धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम