शेतकऱ्यांना सुखद धक्का ; ‘या’ कारखान्याने दिला उसाला सर्वाधिक दर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १० ऑगस्ट २०२३ | राज्यात पावसाचा कहर असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून गेला आहे तर काही शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा राज्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला आहे.  या कारखान्याने 2022-23 सालात गाळप झालेल्या ऊसाला 3 हजार 350 रुपयांचा दर जाहीर केलाय.

गेल्या वर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडत राज्यात सर्वोच्च दर देणारा सोमेश्वर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरलाय. कारखान्याच्या संचालक मंडळाची मासिक सभा पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या ऊसाला टनाला 3 हजार 350 रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून गेलेल्या ऊसाला 2 हजार 846 रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला 54 रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना 2 हजार 900 रुपये अदा केले होते.

paid add

आता सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना अजून टनाला 450 रुपये मिळणार आहेत. गेल्या हंगामात 12 लाख 56 हजार 768 मेट्रीक टनाचे गाळप केले होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमच्या कारखान्याचे नियोजन उत्तम आहे. मागील हंगामात आम्ही साडेबारा लाख टन ऊसाचे गाळप केले आहे.

चांगल्या दरानं साखरेची विक्री झाली आहे. निर्यातील चांगला दर मिळाला. त्यामुळं कारखान्याला अधिकचा नफा झाला. तसेच कारखान्यावर वीज निर्मिती केलीय. कारखान्यावर वीज निर्मिती केलीय. डिस्टलरी प्रकल्प सुरु आहे. यातून साखर कारखान्याला निव्वळ 50 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम