शेतकऱ्यांना मोठी संधी ; ‘हा’ व्यावसाय करून मिळवा लाखो रुपये !

बातमी शेअर करा

बातमीदार | १० ऑगस्ट २०२३ | अनेक शेतकरी दिवसभर शेतात राबून खूप कमी उत्पन्न मिळवत असतो त्यासाठी शेतकरी नियमितपणे जोड व्यवसाय देखील करीत असतो. त्यामुळे शेतकरी किमान घर चालेल इतके उत्पन्न घेत असतो. ज्या शेतकारीना जोड व्यवसाय सुरु करायचा असेल त्यांच्यासाठी हि बातमी उपयुक्त ठरणार आहे. अनेकजण रेशीम किडे पालनाचा व्यवसाय सुरु करत आहेत. कारण या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु या व्यवसायात खूप कष्ट घ्यावे लागतात. हा एक उपयुक्त आणि पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय तुम्हाला घरबसल्या सुरु करू करता येतो.

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला एका प्रसिद्ध रेशीम किड्याच्या फार्ममधून निरोगी आणि रोगमुक्त रेशीम कीटकांची अंडी खरेदी करावी लागतील. हे लक्षात घ्या की रेशीम किडे फक्त तुतीच्या पानांवरच खात असतात, त्यामुळे तुम्हाला तुतीचे झाड लावावे लागणार आहे. समजा तुमच्याकडे ही झाड नसतील तर त्याऐवजी तुम्हाला कीटकनाशक मुक्त तुतीची पाने खरेदी करा.

paid add

रेशीम किड्यांच्या स्वच्छतेसाठी हवेशीर कंटेनरचा वापर करावा. त्यामुळे ते किडे सुरक्षित राहतील. त्याशिवाय तापमान आणि आर्द्रता नियंत्रित वातावरण राखणे खूप गरजेचे आहे. असे केल्याने या किड्यांची वाढ आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या रेशीमची गुणवत्ता चांगली राखली जाते. तुम्ही या किड्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. संगोपनासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

जर तुम्ही हा व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्ही दररोज कंटेनर स्वच्छ करून त्यात पाने बदलावी. त्यातील असणारा कचरा काढून टाकणे गरजेचे आहे. या किड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी ताजी, कीटकनाशक मुक्त तुतीची पाने वापरावीत. तसेच तापमान आणि आर्द्रतेचे निरीक्षण करावे. हे लक्षात ठेवा की रेशीम किड्यांमध्ये गर्दी झाली नाही पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगांचा प्रसार रोखायचा असेल तर नवीन रेशीम किड्यांची अंडी संगोपन क्षेत्रात आणण्यापूर्वी त्यांना वेगळे ठेवावे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवून व्यवसाय केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम