PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ एप्रिल २०२४ । केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी या योजनेचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. आता शेतकरी पीएम किसान योजना १७ वा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहत आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ हजार रुपये जमा होणार आहे. सरकारमार्फत दरवर्षी ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दर चार महिन्यांनी २ – २ हजाराच्या हप्त्यांनी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

paid add

लवकरच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळणार आहे. यावेळी सुमारे नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता सगळे शेतकरी हा हप्ता कधी जमा होईल याची वाट पाहत आहे. तर जून किंवा जुलै महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम