तुरीला ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. देशातील उत्पादन घटीचा अंदाज असल्याने सरकारने तूर आयातीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आयात जोमात सुरु आहे.

 

तर दुसरीकडे देशातील नवी तूरही बाजारात येत आहे. मात्र तरीही तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ६ हजार ९०० ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा दर पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम