सोयाबीनला सरासरी ५ हजार ५०० भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन दरात मोठी वाढ झाली होती. सोयाबीन दराने काल मागील तीन महिन्यातील उच्चांकी १४.९१ डाॅलर प्रतिटनांचा दर गाठला होता.

 

तर सोयापेंडही ४७१ डाॅलर प्रतिटनावर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होत असताना देशातील बाजारातही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे दरही सुधारले होते. त्यामुळे सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम