पालक लागवडीची योग्य पद्धत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I पालेभाज्यांमधून पालक ही लोकप्रिय भाजी आहे. पालकापासून भाजी , सूप ,आमटी, भजे असे अनेक विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. पालकांमध्ये अनेक पोषणमूल्य असतात. या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात तर प्रोटिन्स , कॅल्शिअम , लोह , खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.पालक हे पीक वर्षभर घेता येते. जाणून घेऊयात पालक लागवड पद्धत .

हवामान व जमीन –
१. थंड हवामानात पालकाचे पीक चांगले येते.
२. पालक हे हिवाळी पीक असल्याने कडक उन्हात हे पीक घेणे टाळावेत.
३. पालकाची लागवड विविध जमिनीमध्ये करता येते.
४. खारवट जमिनीत देखील या पिकाची लागवड करता येते.

सुधारित जाती –
भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे पालकाच्या खालील जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
१. पालक ऑल ग्रीन पुसा ज्योती
२. पुसा हरित

लागवड –
१. खरीप हंगामातील लागवड जून , जुलै महिन्यात केली जाते.
२. रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर , ओक्टोम्बर महिन्यात केली जाते.

१० ते १५ दिवसांच्या अंतराने बियांची पेरणी करावी जेणेकरून भाजीचे उत्पादन सतत मिळत राहील.

४. जमिनीवर सपाट वाफे तयार करून बिया फेकून त्यांची पेरणी करावी.
५. बीया मातीत मिसळून त्यास हलके पाणी द्यावे.
६. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर २० ते ३० सेंटिमीटर ठेवावेत.
७.पालकाच्या प्रति हेक्टर लागवडीसाठी २० ते २५ किलो बियाणे लागते.

कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण –
१. पालक पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा उत्तम निचरा करावा , पेरणीपूर्वी थायरम या नाशकाची बियाणांवर प्रक्रिया करावी.
२. हवेतील आद्रता वाढली की पानांवर गोल , मोठे करड्या रंगाचे डाग पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा ब्लॉकटॉक्स २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून त्या मिश्रणाची फवारणी करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम