स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-23 साठी करा अर्ज

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि लवकरच फळबाग सोडत यादी ही काढण्यात येणार आहे. तर, सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर 1 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करावेत. फळबाग सोडत यादी ही डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी पोर्टल (mahadbt farmer) वर अर्ज सादर करावेत.

योजनेविषयी सविस्तर माहिती :

खालील अटींची पूर्तता करणारे होतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील :

1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शोतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत असे शेतकरी. या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.

2. शेतकऱ्याच्या स्वत: च्या नावे ७/१२ असणे आवश्‍यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्‍त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. सोबत विहित प्रपत्रातील नमुना जोडला आहे.

3. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.

4. यापुर्वी महाडिबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्‍ती यांची निवड करण्यात येईल.

लाभ क्षेत्र मर्यादा :-

 

1. या योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्‍टर ते कमाल १०.०० हेक्‍टर तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हेक्‍टर ते कमाल ६.०० हेक्‍टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.

2. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.

3. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा दोन हेक्‍टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ घेता येईल.

4. लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.

अर्जदारांची नोंदणी :-

 

1. सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आघार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे तथापी, सदर प्रक्रिया शेतकर्‍यांना एकदाच करावी लागणार आहे.

2. संकेतस्थळ – महाडीबीटी पोर्टलचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबी करीता www.mahadbtmahait.gov.in/farmer या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम