हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ |हवामानात सतत बदल होत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आता ऐन थंडीत हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागच्या काही दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे.

उद्या (दि.12) नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम