कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | सोयाबीनमध्ये मागील काही दिवसांत मोठे चढ-उतार होत आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात कमी असलेल्या किंमती वाढू लागल्या. सोयाबीनचे दर सध्या काही मार्केटमध्ये प्रति क्विंटल ५,२०० ते ५,८०० रुपयांवर गेल्याचेही दिसत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. जागतिक बाजारामध्ये सोयाबीन, सोयातेल तेजीमध्ये आलेत. त्याचा भारतीय सोयापेंड उत्पदकांना फायदा होताना दिसतोय. येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच ब्राझील पुढील वर्षात बायोडिझेल निर्मितीसाठी सोयातेल वापरण्याचे प्रमाण वाढवण्याच्या बातम्या आल्या आहेत. या सगळ्या घडामोडी सोयाबीनचे दर वाढण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने सोयाबीन विकू नये, तर पाच हजार ते सहा हजाराच्या किंमतपातळीवर लक्ष ठेऊन टप्प्या-टप्प्याने सोयाबीन विकावे, असा जाणकारांचा सल्ला आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम