महाराष्ट्रात पाऊस कोसळणार ; पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 24 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर वाढणार आहे. मात्र त्यानंतर हवामानात बदल होणार असून महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आहे. 24 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावांनी नमूद केले आहे. मात्र पाऊस कोणत्या जिल्ह्यात कोसळेल याबाबत पंजाब रावांनी तूर्तास तरी माहिती दिलेली नाही.

परंतु पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन ते तीन दिवसात 24 तारखेनंतर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता तयार होणार आहे याबाबत नवीन हवामान अंदाज सार्वजनिक करणार आहेत. निश्चितच पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचे भविष्यवाणी केली असल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम