कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | रेशनकार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेशन घेणार्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
रेशन वितरणात घोटाळा करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. जो विक्रेत्यावर यात घोटाळा करत असल्याचा सापडल्यास त्या विक्रेत्यावर कारवाई होणार आहे.
रेशनच्या वजनात अनियमितता असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. यावर आता सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल लावणे बंधनकारक केले आहे. आता कोणताही रेशन विक्रेता इलेक्ट्रॉनिक पॉईंटशिवाय सरकारी रेशन दुकानावर रेशन विकू शकणार नाही. या माध्यमातून रेशन वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात येत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम