यूपीतल्या चित्रकूटच्या पशु मेळाव्यात १० कोटींचा गोलू २ ठरतोय आकर्षण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ ऑक्टोबर २०२२ |ग्रामोदय पशु मेळ्यात १० कोटी रुपये किंमत असलेला गोलू २ हा रेडा हा यूपीतल्या चित्रकूट येथे भरविण्यात आलेल्या मेळाव्यात आकर्षण ठरत असून या रेड्याला पाहायला शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे.

हरियाणाचे नरेंद्र सिंग यांचा रेड्याने विर्याच्या कमाईतून जवळपास २० लाख रुपयांची कमाई करून दिली असून या रेड्याचे वय ४ वर्ष ४ महिने आहे. हरियाणा सरकारने हा रेडा नरेंद्र सिंग यांना भेट दिला होता. गोलूला रोजच्या आहारात ३२ किलो हिरवा चारा आणि सुका चारा दिला जातो. तसेच ८ किलोचे हरभरा गहूचे मिश्रण त्याला आहारात दिले जाते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम