अखेर राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ ऑक्टोबर २०२२ | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (यांना मृतदेह नीरा नदीच्या पात्रात सापडला असून त्यांचा दन दिवसांपासून शोध सुरु होता . १२ ऑक्टोबरपासून शंसिकांत घोरपडे हे बेपत्ता होते.

मात्र ते घरी न परतल्याने त्यांनाच शोध घेण्यात आला असता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुणे ते सातारा मार्गात सारोळा गावाजवळ त्यांनी गाडी थांबवून ते नीरा नदीच्या दिशेने जाताना दिसले. शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत ते बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाशेजारी त्यांची कार आढळून आल्याने त्यांचा रेस्क्यू टीमने नदीपात्रात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम