उडदाच्या दरात सुधारणा ; ६ हजार ते ८ हजार भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ |देशातील बाजारात सध्या उडदाला चांगला दर मिळत असून उडदाची टंचाई जाणवत असल्याने दरात सुधारणा झाली आहे. उडदाची खरेदी त्यामळे सरकार आयात करणार आहे. त्यासाठी सरकारनं किमान आधारभूत दरही जाहीर केला. मात्र मुख्य उडीद पुरवठादार म्यानमारमध्येही उडदाचा साठा कमी आहे. त्यामुळे उपलब्धता वाढली नाही. सध्या देशात उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उडदाचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम