Rose cultivation | तीन बिघा शेतीमध्ये गुलाब फुलाची शेती; शेतकरी मिळवतोय ३ ते ४ लाखांचा नफा!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ एप्रिल २०२४ | गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र मध्ये फुलशेतीला व्यावसायिक शेतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक फुलांच्या शेतीच्या माध्यमातून शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवत आहेत. फुलांना बाजारात नेहमीच मागणी असते, शेतकऱ्यांना त्यातून चांगली कमाई देखील होत आहे. केवळ तीन बिघ्यातील गुलाब फुलशेतीतून वार्षिक ३ ते ४ लाखांचा नफा कमविला आहे.

अमन असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. अमन हे उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सहेलिया गावचे रहिवासी आहेत. तरुण शेतकरी अमन सांगतात की, आपण अगोदर सुरुवातीला १ बिघ्यात गुलाब शेती केली. त्यातील यश पाहता सध्या आपण ३ बिघे जमिनीत गुलाब फुलांची लागवड केली आहे. फळे, भाजीपाला किंवा मग पारंपारिक पिकांच्या तुलनेत गुलाब फुलाच्या लागवडीस फारसा उत्पादन खर्च नसतो. गुलाब फुलाच्या शेतीसाठी कीटकनाशक वापरण्याची गरज पडत नाही. किंवा मग भरमसाठ रासायनिक खते वापरण्याची गरज पडत नाही.

paid add

शेतकरी अमन यांनी सांगितले की, आपण यापूर्वी धान, गहू यांसारख्या पारंपारिक पिकांच्या माध्यमातून शेती करत करायचो. परंतु, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. ज्यामुळे आपण गुलाब शेतीकडे वळण घेतले. त्यानुसार सध्या आपल्याला तीन बिघ्यात गुलाब लागवडीसाठी एकूण २५ ते ३० हजार रुपये इतका खर्च आला. गुलाब फुलाच्या शेतीसाठी केवळ सुरुवातीला कलमद्वारे रोपे तयार करण्यासाठी खर्च येतो. त्यानंतर लागवडीसाठी मजुरी लागते. यापुढे मात्र, पुढील २० वर्षांसाठी गुलाब झाडे तुम्हाला फुलांचे भरघोस उत्पादन देऊ शकतात. वर्षातून दोन वेळा ८ महिने गुलाब फुलांचा हंगाम सुरु असतो. तर वर्षभर इतर चार महिन्याच्या कालावधीत थोड्याफार प्रमाणात फुले सुरूच राहतात.

शेतकरी सांगतात, गुलाब शेती अनेक प्रकारे केली जाऊ शकते. यामध्ये रोपे लावून, तर कलम पद्धतीने देखील गुलाब लागवड होते. आपण आपल्या शेतीत कलम पद्धतीने रोपे तयार करून गुलाब लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची तीन वेळा चांगली मशागत करून घेतली. या दरम्यान जमिनीत चांगले शेतखत मिसळून घेतले. त्यानंतर आपण एक ते दीड फूट असे अंतर ठेऊन गुलाब रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे केवळ तीन महिन्यातच आपल्याला फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सध्या आपल्याला दरवर्षी गुलाब फुलाच्या ३ बिघे लागवडीतून ३ ते ४ लाखांचा निव्वळ नफा सहज मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम