Fishery Business | शेती सोडून मासेपालनाकडे वळले; वर्षाला करताय ७ लाखांची कमाई!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ एप्रिल २०२४ | महाराष्ट्रात मासेपालन व्यवसाय करण्याकडे हळूहळू शेतकरी वळत आहेत. शेतीतुन मिळणारे उत्पन्न आणि पिकांचे उत्पादन घेताना येणारी नैसर्गिक संकटे, यामुळे अने शेतकरी आता शेती संबंधित अनेक व्यवसायाकडे वळत आहे. मांसाला असलेली मागणी पाहता मासेपालनातुन शेतकऱ्यांना अधिकचा लाभ देखील मिळत आहे.

मोगरा फुलशेती करा आणि मिळवा भरघोस नफा; वाचा… किती मिळतो भाव!

लाल डिंगलियाना असे या मासेपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. लाल डिंगलियाना हे देशातील अतिपूर्वेकडील मिजोरममधील महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. प्रामुख्याने मांसाला बाजारातील वाढती मागणी पाहून, लाल डिंगलियाना मासे शेतीकडे वळले. शेतीतून मिळणारे उत्पन्न, त्यातून होणारी आर्थिक ओढाताण यामुळे त्यांनी संपूर्णपणे मासेपालन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. डिंगलियाना यांनी आपल्या २ हेक्टर जमिनीमध्ये १९ सिमेंट तलाव निर्माण केले आहे. यासाठी त्यांना २०१७ मध्ये सुरुवातीला ८ लाखांचा खर्च आला. परंतु, त्यानंतर त्यांना दरवर्षी वार्षिक ७ लाखांची कमाई मिळत असल्याचे लाल डिंगलियाना हे म्हटले आहे.

पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान; मिळवा १०० टक्के अनुदान!

लाल डिंगलियाना यांनी मासेपालनासाठी ‘कॉमन कार्प’ या प्रजातीची निवड केली आहे. त्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये या प्रजातीच्या माश्यापासून एकूण ८ टन उत्पादन मिळाले. ज्यासाठी त्यांना एकूण १० लाख रुपये खर्च आला. पहिल्या वर्षी उत्पादनातून सुरुवातीची एकूण गुंतवणूक मिळाली. त्यानंतर त्यांना मागील ५ वर्षांपासून मासे उत्पादनातून ३१ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. ज्यातून १० लाख रुपये खर्च वजा जाता, २१ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

त्यानंतर लाल डिंगलियाना यांनी, यावर्षी ‘कॉमन कार्प’ माशाच्या प्रजनन प्रक्रियेत सुधारणा करत, मासे उत्पादनाच्या उसळी घेतली आहे. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामुळे त्यांना मासे उत्पादनात वाढ करण्यास मदत झाली आहे. सध्या त्यांनी आपल्याकडे ८ लोकांना नियमित रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. तसेच व्यवसायामध्ये काही सुधारणा केल्याने, मासेपालनातून त्यांना वार्षिक ७ लाखांचा निव्वळ नफा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची मासेपालन व्यवसायातील कामगिरी पाहून, केंद्र सरकारने लाल डिंगलियाना यांना २०१९ साली पूर्वेकडील सर्वश्रेष्ठ मत्स्य किसान पुरस्कार देखील प्रदान केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम