राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ एप्रिल २०२४ | राज्यात अवकाळी पावसाने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच पावसाचे पुनरागमन झाले आहे. उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने उपराजधानीसह काही शहरांना आज अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

आज सकाळपासूनच उपराजधानीत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी देखील पावसाने हजेरी लावली होती. आज आकाश पूर्णपणे ढगांनी काळवंडले आहे. पाच दिवसांच्या प्रचंड उष्णतेनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दक्षिण भारतात “सायकलोनिक सर्क्युलेशन” तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

paid add

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीला उष्णतेचा जाच सहन करावा लागणार आहे. परंतु, हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार, अशी शक्यता वर्तवली आहे.

विदर्भात वादळी पाऊस, गारपिटी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम