रब्बी हंगामाकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदानीत दराने हरभरा व ज्वारी बियाणे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ ऑक्टोबर २०२२ | जिल्ह्यातील शेतकरी बंधुना कळविण्यात येते की, कृषि विभाग, भारत सरकार, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला (महाबीज) मार्फत दर्जेदार तथागुणवत्तपुर्ण प्रमाणित बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत उपलब्ध आहे. यामध्ये हरभर दहा वर्षा आतील वाण अवघे ४५ रु प्रति किलो तसेच दहा वर्षावरील ज्वारी बियाणे ३७ रु प्रति किलो प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्राकरीता महाबीजचे अधिकृत विक्रेते तथा उपविक्रेते यांचे मार्फत मिळणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आलेले अनुदानित दराचे पीक / वाण

हरभरा – फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय -२०२, पीकेव्ही – कांचन

ज्वारी (दादर) – दहा वर्षावरील वाण परभणी मोती, पीकेव्ही क्रांती, मालदांडी, फुले वसुधा

अनुदानीत बियाणे कसे प्राप्त करावे ..?

शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील कृषी सहाय्य्क तथा कृषी अधिकारी यांचे कडून बियाणे परवाना घेऊन, ७/१२ व आधार कार्ड ची प्रत देऊन महाबीज विक्रेत्याकडून अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे. महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम तथा खऱ्या अर्थाने शेतक-यांची कंपनी असलेल्या महाबीज मार्फत जळगाव जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रमाणित बियाण्याचा वापर करुन उत्पादन तथा उत्पन्न्‍ वाढीसाठी शेतकरी बांधवांनी घरगुती बियाणे वापर कमी करुन अत्यल्प दरात उपलब्ध असलेला सुधारित तथा प्रमाणित बियाण्यांचा वापर या रब्बी हंगामामध्ये करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम