गद्दारी आमच्यासोबत ; शेतकऱ्यांसोबत करू नका – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा

 

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |  परतीच्या पावसाने अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट असूनही राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. यातून त्यांची असंवेदनशीलता दिसत आहे. तुम्ही आमच्यासोबत गद्दारी केली, शेतकऱ्यांसोबत करू नका, असे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले.

paid add

आदित्य ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आणि परिस्थितीची पाहणी केल्यावर त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम