मुडी प्रगणे डांगरी येथे बळीराजा महोत्सव उत्साहात

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथे नुकताच बळीराजा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

शिवव्याख्याते प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी सम्राट बळीराजा यांचा जीवनपट सादर केला याप्रसंगी बळीराजा आग ऍग्रो समूहाचे संचालक किरण सूर्यवंशी तसेच जयवंतराव पाटील आणि संभाजी ब्रिगेड उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्यामकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात झाला.

याप्रसंगी मुडी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सम्राट बळीराजा सन्मान 2022 23 अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी नवरात्र उत्सवा दरम्यान एका आदिवासी महिलेचे प्राण आणि तिच्या बाळाला जीवदान देणाऱ्या आरोग्य कर्मचारी सुनीता सैंदाणे यांना सर्वात कष्ट आरोग्य सेवा प्रदान केल्याबद्दल सम्राट बळीराजा आरोग्य सेवा सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

paid add

संभाजी ब्रिगेड अमळनेर तालुका अध्यक्ष किरण नानासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब सूर्यवंशी ,माजी सरपंच मुडी, प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी ,प्राध्यापक लीलाधर पाटील, शामकांत पाटील, गुणवंत पाटील, महेंद्र पाटील, संजीव पाटील, प्रफुल वानखेडे, प्रभाकर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी, श्रीयुत बोरसे यांचे सहकार्य लाभले..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील तसेच तुषार भाऊ सैंदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण कुमार सूर्यवंशी यांनी केले .

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम