लंम्पी मुळे दोन बैल मोहराळा येथे दगावले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | दोन दिवसात लंम्पी आजारामुळे दोन बैल दगावल्याची घटना यावल तालुक्यातील मोहराळा येथे घडली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून लंम्पी आजारावर उपचार सुरु असतांना बैलांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मोहराळा ता.यावल येथे गावात लंम्पीचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. दोन दिवसात येथे दोन बैल दगावले आहे. शुक्रवारी येथे एक बैल दगावला होता व पुन्हा शनीवारी गावातील शेतकरी प्रकाश जिजाबराव पाटील यांच्या ५० हजार रूपये किंमतीच्या बैलाचा लम्पीवर उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. या बाबत पशुधन विकास अधिकारी कार्यालय यावलचे डॉ. एस.एन. बढे यांना माहिती देण्यात आली. तेव्हा गावात डॉ. राजू सुशिल, सहाय्यक युवराज अडकमोल यांनी येवून मृत बैलाचा पंचनामा केला व नंतर शवविच्छेदन करून बैलावर अंतसंस्कार करण्यात आले.

paid add

लंम्पीमुळे गावात दोन दिवसात दोन बैल दगावाल्याने पशु पालक व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. लंम्पीमुळे बैल दगावल्याने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम