चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ I चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने बळी घेतला. कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी गावांतील प्रत्येकी एक पशुधन या आजारामुळे दगावलेअसल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीमुळे येथील पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला असून लम्पी स्कीनसदृश लक्षणे दिसणाऱ्या जनावरांवर तत्काळ उपचार सुरू केले आहेत.

तसेच तालुक्यात ३० हजार ८०६ जनावरांना लम्पी स्कीनची लसही देण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी श्री. बारपात्रे यांनी दिली.चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये लम्पी स्कीनसदृश आजाराची जनावरे आढळली होती. त्यांच्या वैद्यकीय तपासणीअंती व नमुन्यांच्या अहवालानुसार काही जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले होते.

आतापर्यंत आढळलेली लम्पी स्कीनसदृश जनावरे व लम्पी स्कीनग्रस्त जनावरांवर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. यामध्ये कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी येथील शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक जनावर लम्पी स्कीनमुळे दगावल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी त्यानंतर या जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या. तसेच त्या-त्या गावांतील व परिसरातील सर्वेक्षणही करण्यात आले.तालुक्यात लम्पी स्कीन आजाराची साथ पसरू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष काळजी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर लम्पी स्कीन लसीकरणावर भर देण्यात आला आहे. शासनाने पाठविलेल्या ३१ हजार ३०० लसींमधून ३० हजार ८०६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम