‘टेक्नोटेक्स-२०२३’ कर्टन रेझर कार्यक्रमाचे उदघाटन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ I‘देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्यागासाठी लागणारा कापूस कमी दरात मिळण्यासाठी राज्य सरकार कापूस खरेदी करून तो नियमित योग्य दरात उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’’ असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘टेक्नोटेक्स-२०२३’ कर्टन रेझर कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. या वेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, ‘फिक्की’चे अध्यक्ष मोहन कावरीय, ‘एसआरटीईपीसी’चे अध्यक्ष धीरज शहा आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करेल. पीएम मित्र योजनेअंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन अंतर्गत मुंबईत २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-२०२३’ला राज्यशासन सहकार्य करेल,’’ असे पाटील यांनी सांगितले.केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या, ‘‘भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास १३ टक्के आहे. जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘पीएम मित्र’ या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम