उडदाची टंचाई झाल्याने दारात वाढ कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ |देशात यंदा उडदाची पेरणी आणि उत्पादनही कमी झाले असून बाजारांमध्ये उडदाची टंचाई भासत आहे. दरही वाढले आहेत. पुढील काळातही उडदाचे दर तेजीत राहतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील हंगामात उडदाचे उत्पादन १ लाख ९४ हजार टन झाले होते. पेराही अधिक होता. मात्र यंदा उडदाची पेरणीही कमी झाली. त्यातच पावसाने पिकाला फटका बसला. परिणामी उत्पादन १ लाख ८४ हजार टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. उडीद उत्पादन कमी राहील्याने एकूण कडधान्याचा पुरवठाही कमी राहील. उडदाला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. उडदाचे दर कायम राहतील असे जाणकारांनी व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम