परभणी , हिंगोली जिल्ह्यात २ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ |यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात शुक्रवार पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी १ लाख ६१ हजार ७९७ हेक्टर (५९.८ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १लाख ७६ हजार ८९१ पैकी ७३ हजार ९२३ हेक्टरवर (४१.८ टक्के) अशी या दोन जिल्ह्यांत मिळून एकूण २ लाख ३५ हजार ७२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

 

यंदाही शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती आहे. दोन जिल्ह्यांतील अनेक शेतकरी यंदा राजमा या पीकाकडे वळले आहेत. त्यामुळे यंदा राजम्याचे क्षेत्र वाढणार आहे.परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ६६ हजार ७१६ हेक्टरवर (४२.६६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीचा पेरा अधिक आहे. कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी ९४ हजार ९४८ हेक्टरवर (८४.५७ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ९४ हजार ९३९ हेक्टर, (८४.६४ टक्के) पेरणी आहे करडई, जवस, तीळ, गळित धान्यांची ३ हजार ६४४ पैकी ७७७ हेक्टरवर (२१.३२ टक्के) पेरणी झाली.

 

त्यात करडईची ३ हजार ३७१ पैकी ७५५ हेक्टर (२२.३९ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी ७ हजार ९७३ हेक्टर (१४.३२ टक्के) त्यात ज्वारीचे क्षेत्र कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी ६५ हजार ६६८ हेक्टरवर (५४.५६ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ६५ हजार ६६८ हेक्टर (५४.६६ टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची ८४२ पैकी २८२ हेक्टर (३३.४५ टक्के) पेरणी झाली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम