कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ I या वर्षीच्या रब्बी हंगामात शुक्रवार (ता. २५)पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी १ लाख ७४ हजार ४३१ हेक्टर (६४.४१ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ३५ हजार २०८ हेक्टरवर (७६.४४ टक्के) अशी या दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ३ लाख ९ हजार ६३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आजवरच्या पेरणीमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र २ लाख ६ हजार २३६ हेक्टर आहे.
परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ७२ हजार ९८४ हेक्टरवर (४७.१२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ९० पैकी ५६ हजार ४८५ (४९.५८ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १५ हजार ४०६ हेक्टर (३०.१९ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी १ लाख ५७६ हेक्टरवर (८९.५८ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी १ लाख ५६२ हेक्टर (८९.६५ टक्के) पेरणी आहे. करडई, जवस, तीळ, गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी ८७० हेक्टरवर (२३.८९ टक्के) पेरणी झाली. त्यात करडईची ३ हजार पैकी ८२२ हेक्टर (२४.३८ टक्के) पेरणी झाली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम