कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ I उजनी धरणात सध्या १११ टक्के पाणीसाठा आहे. रब्बी पिकांसाठी उजनीतून पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सोडले जाणार आहे. तसेच २५ मार्च ते २५ एप्रिल आणि तेथून पुढे २० मेपर्यंत एकच मोठे आवर्तन सोडले जाईल. त्यावर कालवा सल्लागार समितीत अंतिम निर्णय होणार आहे.
उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरले असून, रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील शेतीला कॅनॉलद्वारे पाणी मिळते. बार्शी उपसा सिंचन योजना, शिरापूर, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून आणि बोगद्यातून देखील पाणी वितरीत होते. धरणावरून जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
सोलापूर शहराला देखील उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना आणि लातूर, उस्मानाबाद शहरालाही उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात शेती व जनावरांची तहान भागविण्यात उजनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या कमी होऊन हरितक्रांतीची मुहूर्तमेढ उजनीनेच रोवली.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम