देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ Iआंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर सुधारत आहेत.

मात्र देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिर आहेत. आजही देशात सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनचे दर दबावात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री कमी केली आहे.

सध्या देशात सरासरी अडीच लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे. सध्या सोयाबीन बाजार स्थिर असला तरी पुढील काळात सोयाबीन दर सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम