कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ Iकाॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्राकडे कापूस आयातीवरील शुल्क रदद् करण्याची मागणी केली.
त्याचा काहीसा मानसिक परिणाम बाजारावर जाणवला. काही बाजारांमध्ये आज कापूस दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. मात्र सरकार उद्योगाची ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे.
तसेच सरकारने आयातशुल्क कमी केले तरी निर्यातदार देश दर वाढवतील. त्यामुळे कापूस दरावर फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम