साखरेचे दर तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ |जागतिक बाजारात आहेत. त्यामुळे भारतीय साखरेची मागणीवाढलीय. पुढील काळात साखरेच्या किंमती आणखी वाढण्याची आशा साखर कारखान्यांनाआहे. त्यामुळे निर्यातीच्या मागणीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी कारखान्यांनी कंबर कसली आहे. अनेक साखर कारखान्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यापैकी निम्मी साखर विकल्यानंतर नवीन निर्यात करार करण्याचे थांबवले आहे. साखरेच्या दरातील तेजीचा फायदा उठवून वाढीव दराने साखर निर्यात करण्याकडे त्यांचा कल आहे.यंदा मात्र केंद्र सरकारने ६० लाख टन निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकार दुसऱ्या टप्प्यात साखरेच्या निर्यात कोट्यात आणखी वाढ करेल, असा साखर कारखान्यांचा अंदाज आहे. यंदाचा उसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि ठरलेली एफआरपी मिळण्यासाठी साखरेच्या दरातील तेजीचा फायदा होणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम