मका आवक वाढली, दरही सुधारले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील बाजारात मक्याची आवक आता वाढत आहे. हळूहळू मक्यातील ओलावाही कमी होतोय. सध्या ओलावा कमी असलेल्या मक्याला प्रतवारीनुसार प्रति क्विंटल २ हजार ते २ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. मक्याची किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव १९६२ रूपये आहे. मक्याला निर्यातीसाठीही मागणी येतेय. यंदा मक्याचे दर हमीभावापेक्षा जास्त राहतील, असे एकंदर चित्र आहे. मक्याला पशुखाद्यासाठी मोठी मागणी असते. तसेच स्टार्च उद्योगाकडूनही मक्याची खरेदी होते. त्याच प्रमाणे इथेनॉल निर्मितीसाठीही मक्याला मागणी असते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम