परभणी जिल्ह्यात विविध पिकांच्या ५२ हजार ३७३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात सोमवार पर्यंत विविध पिकांच्या ५२ हजार ३७३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. त्यापैकी ३८ हजार २८५ क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.

 

त्यात हरभऱ्याच्या ३३ हजार ३४० क्विंटल बियाणे विक्री झाली आहे. विविध पिकांचे १४ हजार क्विंटल बियाणे शिल्लक होते.जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात २ लाख ७८ हजार ३९८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात हरभरा १ लाख ३७ हजार ९०६ हेक्टर, ज्वारी ९९ हजार ९४० हेक्टर, गहू ३७ हजार ३८६ हेक्टर, मका १ हजार ६२८ हेक्टर, करडई १ हजार ११६ हेक्टर, सूर्यफूल २३.२५ हेक्टर, इतर पिके ३९८.९७ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम